amit thackeray sakal media
महाराष्ट्र बातम्या

अमित ठाकरेंचा उद्यापासून नाशिक दौरा; पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी खलबतं

मिलिंद तांबे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे उद्यापासून (ता. 27) तीन दिवसांच्या नाशिक (nashik visit) दौऱ्यावर आहेत. 27,28 आणि 29 ऑगस्ट रोजी ते नाशिक मध्ये तळ ठोकून बसणार आहेत. नाशिक महानगरपालिका (nashik municipal election) निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक मध्ये पक्षाच्या पुनर्बांधणीची (political work) जबाबदारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अमित ठाकरे यांच्या खांद्यावर दिली आहे.

अमित ठाकरे यांचा हा तिसरा नाशिक दौरा आहे. नाशिक महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. अमित ठाकरे या दौऱ्यात मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष देणार आहेत. यानिमित्ताने ते पदाधिकाऱ्यांशी बोलणार देखील आहेत. काही पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या होणार असून रिक्त पदे भरली जाणार आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष पदाधिकऱ्यांसोबत बैठका घेऊन त्याची रणनीती देखील या बैठकीत ठरवली जाण्याची शक्यता आहे. नाशिक मधील संपूर्ण राजकीय परिस्थितीचा अहवाल ते फाज ठाकरे यांच्याकडे सोपवणार असून राज ठाकरे अंतिम निर्णय घेतील. या दौऱ्यात अमित ठाकरे यांच्या सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अनिल शिदोरे, संदीप देशपांडे असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara: 'क्रिकेटसाठी तू बरीच तडजोड केलीस, आता...' पुजारासाठी पत्नी पूजाची भावनिक पोस्ट

'वडापाव'मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी; ठरणार प्रसाद ओकचा १०० वा चित्रपट

Video: असं कुठं होतं का राव! US Open स्पर्धेत टेनिसपटूचा राडा, फोटोग्राफरचा व्यत्यय अन् भिडला अम्पायरला; प्रेक्षकांनी दिली साथ

Hartalika Vrat 2025 Marathi Wishes: शिव व्हावे प्रसन्न...! हरतालिकेच्या प्रियजनांना पाठवा मराठीतून खास शुभेच्छा, वाचा हटके संदेश

Nashik Crime : एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; सिडकोतील अल्पवयीन विद्यार्थिनीने संपवलं जीवन, दोघे संशयित अटकेत

SCROLL FOR NEXT