Raj Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : भूमिका बदलण्यावर अन्.... मोदींना पाठिंबा देण्याच्या निर्णयावर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले...

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर अनेक मनसे सैनिकांनी समर्थन दिलं तर अनेकांनी नाराजी जाहीर करत राजीनामे देखील दिले. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळे मनसे सैनिक नाराज असल्याचं दिसून येत होतं.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Raj Thackeray : निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, त्यानंतर पक्षातील अनेकांनी राजीनामा दिला आणि राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका पटली नसल्याचे सांगितले. या दरम्यान आज मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची आज पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचा आहे. त्याचं कारण देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. पहिल्या पाच वर्षात जे पटलं नाही त्याचा विरोध केला आहे. लोकं म्हणतात की, राज ठाकरे यांनी भूमिका बदलली आहे. भूमिका बदलली नाही. धोरणावर कायम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींचं नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला. मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं. 1992 पासूनची मागणी पूर्ण झाली. राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, असं कारण राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्यावर दिलं आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा सभेत महायुतीला पाठिंबा दिला होता.

राज ठाकरेंच्या या निर्णयानंतर अनेक मनसे सैनिकांनी समर्थन दिलं तर अनेकांनी नाराजी जाहीर करत राजीनामे देखील दिले. राज ठाकरेंनी भूमिका बदलल्यामुळे मनसे सैनिक नाराज असल्याचं दिसून येत होतं. यावर आज राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

पाच वर्षात अनेक बदल झाले, त्यामुळे त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. राम मंदिर निर्माण, 370 कलम असे अनेक निर्णय चांगले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले. पाठिंबा देताना मला पक्षाचा विचार करावा लागतो. ज्यांना ही भूमिका पटत नाही, ते निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT