raj thackeray anil deshmukh e sakal
महाराष्ट्र बातम्या

'ते' गृहमंत्री ED ला वेडे समजले, राज ठाकरेंचा अनिल देशमुखांना टोला

भाग्यश्री राऊत

नाशिक : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर (Anil Deshmukh case) १०० कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर अनिल देशमुखांच्या मागे ईडी, सीबीआय आणि प्राप्तीकरण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्या मालमत्तेवर अनेकदा छापेमारी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अनेकदा नोटीस बजावून देखील ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यावरूनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj thackeray) यांनी टोला लगावला आहे.

राज्यात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी शरीयत सारखा कायदा आणायला पाहिजे. त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. कोणाला कुठल्या गोष्टीची भीतीच उरली नाही. माजी गृहमंत्र्यांना चौकशीसाठी ईडी बोलावते. ते जात नाहीत. ते ईडीला येडे समजले बहुदा. ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणांना दुय्यम समजले जाते, तिथे अशा घटना घडणारच, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, शंभर कोटी वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून केंद्रीय तपाससंस्था त्यांच्या हात धुवून मागे लागल्या आहेत. देशमुखांकडे ईडीने आतापर्यंत सहा व सीबीआयने दोन वेळा छापा टाकला. हवालामार्फत सुमारे चार कोटी रुपये देशमुख यांच्या मालकीच्या साई शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाल्याने ते आणखीच अडचणीत आले आहेत. प्राप्तिकर विभागाने देशमुखांच्या घरी प्रथमच छापे टाकले होते. वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापासून ते अज्ञात स्थळी आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

ईडीने यापूर्वीसुद्धा देशमुखांच्या नागपूर, काटोल आणि मुंबईच्या घरी छापा टाकला होता. ईडीने वारंवार नोटीस बजावून त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे. मात्र, देशमुख अद्याप ईडीसमोर गेलेले नाही. त्यांनी आपल्या वकिलांमार्फत जबाब नोंदवला आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाई रोखण्यासाठी देशमुख यांनी न्यायालयातसुद्धा धाव घेतली होती. मात्र, त्यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. दरम्यान त्यांच्या दोन स्वीय सहायकांना अनेक दिवसांपासून ताब्यात घेण्यात आले आहे. मध्यंतरी मुंबई येथून देशमुखांचे जावई यांनाही तपासणीसाठी नेण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

SCROLL FOR NEXT