Raj Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Video : पावसाळी अधिवेशनातून राज्याला काय मिळणार? मनसे अध्यक्षांचे 'ठाकरे स्टाईल' उत्तर, म्हणाले...

रोहित कणसे

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेश उद्यापासून मुंबई येथे सुरू होत आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होणार असून ते १४ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान या अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्याने विरोधकांची ताकद कमी झाल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर विरोधक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यावरून धारेवर धरणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आगामी अधिवेशनातून राज्याला काय मिळणार या प्रश्नाला ठाकरे स्टाइलने उत्तर दिलं आहे. राज ठाकरे म्हणाले की, प्रत्येक घरात संतापाचे वातावरण आहे महाराष्ट्रात मागचे दीड ते दोन वर्षे जे राजकारण सुरू आहे, ते फार संतापजनक आणि घाणेरडं राजकारण आहे. हे याआधी कधीही घडलं नव्हतं. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवणारी ही घटना आहे.

मला आश्चर्य वाटत नाही की यांच्या ज्या तडजोडी चालत असतात, एकमेकांसोबत भांडून पुन्हा एकत्र येतात. जे झालं ते झालं पण भविष्यात ज्यांना राजकारणात यायंचं त्यां भविष्यातील पिढ्यांसोमर ताटात वाढलंय, ते कोणत्या प्रकारचं राजकारण करणार? त्यांना जर हेच राजकारण असतं असं वाटायला लागलं तर महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल? याचा विचार न करता सत्तेचं आणि स्वार्थाचं राजकारण करणं घाणेरडं आहे असे राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान यावेळी उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाठी अधिवेशनातून महाराष्ट्राला काय मिळणार? असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे यांनी 'घंटा' असं एका शब्दात उत्तर दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशन मुंबईत १५ दिवस सुरू राहणार असून या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT