Raj Thackeray MNS leaders team in Nagpur today Sakal
महाराष्ट्र बातम्या

'मी विदर्भात पुन्हा येईन' पण...; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

दत्ता लवांडे

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज पहिला दिवस असून त्यांनी आज नागपुरात आपल्या पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली. येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ऑपरेशननंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विदर्भात आपल्या कार्यकर्त्यांसोबत बऱ्याच बैठका घेणार आहेत.

(MNS Chief Raj Thackeray Latest News)

"आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर पक्षाची मोर्चेबांधणी करा, मी लवकरच विदर्भात येईन पण तोपर्यंत पक्ष नीट बांधा, आपल्या पक्षात बदल निश्चित होणार असून पक्षात नवी उर्जा आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आपण सगळे मिळून पक्षाच्या नवनिर्माणाचं काम करू, त्यासाठी तुम्हाला स्थानिक पातळीवर पक्ष बांधावा लागेल" अशा सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

"स्थानिक पातळीवरील शाखेमधून पक्षसंघटना मजबूत करण्याचे आदेश राज साहेबांनी दिले. त्यानंतर आपला पक्ष वाढणार असून मी पुन्हा विदर्भात येईल असं त्यांनी सांगितलं पण संघटना जास्तीत जास्त वाढली पाहिजे अशी साहेबांची इच्छा आहे" अशी माहिती मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसे मैदानात उतरली असून स्वतंत्र लढण्याची घोषणा मनसेने केली आहे. विदर्भ दौऱ्यात पक्षसंघटना बळकट करण्याचा मनसेचा प्रयत्न असून त्यानुसार कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येत आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे मुंबईतील पदाधिकारीही आहेत.

भाजपसोबत युती नाही

मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणानंतर मनसे भाजपसोबत युती करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर भाजप हा कामापुरता मित्र आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत युती करणार नाही अशी माहिती मनसेचे अविनाश जाधव यांनी दिली होती. त्यामुळे आगामी निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Raksha Andolan: राम मंदिर देणगीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार! महाराष्ट्रातून 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा; कुठून सुरूवात होणार?

Fact Check: वैभव सूर्यवंशीने Laila Faisal ची रिल केली रिपोस्ट; अभिषेक शर्माच्या कथित गर्लफ्रेंडला फॉलो करतोय पठ्ठ्या

Khambatki Ghat Landslide : पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ दरड कोसळली; काही काळ वाहतूक विस्कळीत, सहाव्या वळणावर नेमकं काय घडलं?

Yogini Ekadashi 2026: आषाढ महिन्यातील पहिली एकादशी ! जाणून घ्या अचूक तारीख आणि व्रताचे नियम

Latest Marathi News Live Update : मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 2 दिवस रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT