महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : मनसे स्वबळावर विधानसभेच्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019
मुंबई  -विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. निवडणुकीच्या प्रचारासाठी पाच ऑक्‍टोबरला पहिली सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांनी जागांची संख्या सांगितली नसली तरी, मनसेकडून किमान १५० जागा लढविण्यात येणार असल्याचे नेत्यांनी खासगीत सांगितले.

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे सांगितले. या वेळी त्यांच्या उपस्थितीत धुळ्यातील आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील, अशी घोषणा केली. शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीही मनसेत प्रवेश केला.

कोहिनूर मिलप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केल्यानंतर राज ठाकरे यांनी आज पक्षाचा निर्णय जाहीर केला. काही दिवसांपासून त्यांनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत तर्क लढवले जात होते. मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही राज ठाकरे ‘ईडी’च्या चौकशीनंतर शांत झाल्याचे म्हटले होते. 

आज अखेर राज ठाकरेंनी आज मौन सोडले. या वेळी बोलताना त्यांनी लढविण्यात येणाऱ्या जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचे सांगितले. पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून, इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले. उमेदवारांची रोज चार-पाच नावे जाहीर करेन, असे मिस्कील भाष्यही या वेळी त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT