Amey Khopkar Sakal
महाराष्ट्र बातम्या

"मोठ्ठा 'आवाज' होणार" ; राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेची घोषणा

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. मशिदींवरच्या भोंग्यांसंदर्भातलं राज ठाकरे यांचं वक्तव्य, त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांच्या आलेल्या टीकाटिपण्ण्या, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतलेली बहुचर्चित उत्तरसभा यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आता पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चेत येणार असल्याची चिन्हं आहेत.

मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट मनसेच्या पत्रकार परिषदेसंदर्भातलं आहे. आपल्या ट्विटमध्ये खोपकर म्हणतात, आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत मोठी घोषणा... मोठ्ठा आवाज होणार आहे!

आता ही घोषणा काय असेल की पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेत मुस्लीमविरोधी भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे भाजपा-मनसे युतीच्या चर्चाही राज्यातल्या राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

मशिदींवरचे भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटममुळेही मनसेच्या पुढच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत काय होणार? मनसे कोणती मोठी घोषणा करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Maskar Silver Medal : मुलीच्या रायफलसाठी वडिलांनी विकली जमीन; कोल्हापूरच्या सोनम मस्करचे आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक

Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Importance of Literature : मनाची लाखो शकलं करणाऱ्या काळात साहित्य का गरजेचं आहे?

Marathi News Live Updates : भुसावळ शहरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मानवी मृतदेह

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

SCROLL FOR NEXT