sandeep deshpande attack cctv esakal
महाराष्ट्र बातम्या

Video : संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी दुसरा व्हीडिओ आला समोर; स्पष्ट दिसणारे दोघे कोण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः संदीप देशपांडे यांच्यावर काल हल्ला झाला. याप्रकरणी एक व्हीडिओ समोर आला होता. त्यामध्ये संशयित हल्लेखोर एका गाडीखाली स्टंप टाकतांना दिसतोय. आता नवीन व्हीडिओ समोर आलेला आहे. यामध्ये दोघेजण चालतांना दिसत आहेत.

काल मॉर्निंग वॉकला गेलेले मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात दोघांनी हल्ला केला. संदीप देशपांडे यांनी प्रतिकार केला नसता तर अनर्थ घडला असता. हल्ल्यानंतर देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलेला असून दोघांना ताब्यात घेतलंय.

आज सकाळी देशपांडे हल्ल्याप्रकरणी दुसरा व्हीडिओ समोर आलाय. यामध्ये दोघेजण चालतांना दिसत आहेत. 'टीव्ही ९ मराठी'ने याबाबतचे वृत्त दिले असून संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणाशी या व्हीडिओचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.

संदीप देशपांडे हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना दोघांना ताब्यात घेतलं आहे. मुंबईतल्या भांडूप भागातून दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं असून राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पोलिस इतर आरोपींचाही शोध घेत आहेत.

संदीप देशपांडे हे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत होते. त्यांना एकटं पाहून तोंडावर मास्क लावलेले चौघे तिथे आले. त्यांनी संदीप यांच्यावर हल्ला सुरु केला. हातातल्या स्टंपने त्यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न झाला.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT