Raj Thackeray
Raj Thackeray esakal
महाराष्ट्र

MNS Party : अठराव्या वर्षांतल्या ‘मनसे’कडे सर्वांचे लक्ष; राज ठाकरे यांची आज जाहीर सभा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते. त्यांच्याकडे मते, खासदार नसले तरी देशभरात महाशक्ती म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष केवळ एक आमदार असलेल्या मनसे या पक्षाकडे अपेक्षेने पहातो आहे. राज्यातील सत्तेच्या लंबकात शहरी, तरूण व हिंदू मतांचे ध्रुवीकरण आपल्या बाजूने करायचे तर त्या मतांवर प्रभाव असणारे राज ठाकरे आपल्या कंपूत असायला हवेत, यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून त्यांच्या हयातीत कांही नेते बाहेर पडले. दुसऱ्या पक्षांच्या वळचणीला जावून बसले. राज ठाकरे हे त्यांचे पुतणे. जे त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले. बाळासाहेबांचा वारसा, वक्तृत्वाचे, नेतृत्वाचे गुण असतानाही आपल्याकडे शिवसेनेचे नेतृत्व न येता उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार हे कळताच ते वेगळे झाले. त्यांनी इतर पक्षातन जाता स्वत:चा नवा पक्ष मनसे स्थापन केला.

मराठी माणसाच्या हक्कांच्या रक्षणासाठी स्थापलेल्या या पक्षाच्या स्थापनेला १८ वर्षे उलटून गेली आहेत. बरोबर अठरा वर्षांनी याच राज ठाकरेंना भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साद घालताहेत. ठाकरे महायुतीला पाठिंबा देतील, अशी अपेक्षा व्यक्त करताहेत. अलिकडच्या काळात मनसेचा जनाधार कमी झाला असला तरी भाजपला राज हवे आहेत.

आजवर दोघांच्या एकत्र ज्या अडचणी होत्या, त्यातील सर्वात मोठी म्हणजे उद्धव ठाकरे यांचा राज यांना असलेला विरोध अन्‌ दुसरा म्हणजे उत्तर भारतीयांबद्दलचा राज यांच्या पक्षाचा विरोध. खरे तर छोट्या ठाकरेंच्या पक्षात भय्या होते, आहेत. त्यामुळे खरा अडथळा होता तो उद्धव ठाकरेंचा. आज ते भाजपसमवेत नाहीत. त्यामुळे शत्रुचा शत्रू तो मित्र व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

‘मोदींनी पंतप्रधान व्हावे’, असे जाहीर विधान करणारे राज केवळ पाच वर्षांपूर्वी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत केवळ मोदीच नव्हे तर भाजपवर प्रश्न उपस्थित करत होते. आता सगळे बदललेय. राज समवेत आले तर ठाकरे मिळतील. ठाकरेंशिवाय भाजपला महाराष्ट्रात प्रचार करता येत नाही वाटते, असा शेरा उद्धव यांनी मारला आहेच. राज केवळ १५ दिवसांपूर्वी दिल्लीला जावून आले आहेत.

अमित शहा यांच्या भेटीला विनोद तावडे त्यांना जातीने घेऊन गेले. तरीही राज यांनी त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. ते काय सांगतील त्यावर बरेच अवलंबून आहे. भाजपबद्दल त्यांनी काही बोलणे हे पक्षाला अडचणीत आणणारे ठरू शकेल. लोकसभेत भाजपच्या धोरणांना पाठिंबा दिला, विधानसभेत काही जागा मागितल्या तर पाठोपाठ येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसेचे काही कार्यकर्ते निवडून येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT