Raj Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंच्या पाहणीनंतर कार्यकर्त्यांची 'अ‍ॅक्शन' मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीचे ऑफिस फोडलं

MNS: ठाकरे यांनी बुधवारी (दि. १६ ऑगस्ट) पनवेल या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Goa Highway:राज ठाकरे यांनी बुधवारी (दि. १६ ऑगस्ट) पनवेल या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. एका कार्यक्रमात राज ठाकेरेंनी मुंबई-गोवा महामार्गावर खर्च करण्यात आलेली रक्कम लोकांना सांगितली होती. या महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे किती लोकांचा मृत्यू झाला याबाबतही त्यांनी माहिती दिली.

अशातचं, ज्या कंपनीने मुंबई-गोवा महामार्गाचे काम केले होते, त्या कंपनीच्या कार्यालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. कार्यकर्ते यावेळी आक्रमक होते. कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने घोषणाही दिल्या.

राज ठाकरेंनी बुधवारी पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसाठी 'निर्धार' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील रस्त्यांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारताचं यान चंद्रावर जातंय, पण रस्ते चांगले मिळत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील रस्त्यांच्या झालेल्या दुराव्यस्थेवर त्यांनी भाष्य केलं.(Latest Marathi News)

राज ठाकरेंनी यापूर्वीही टोलनाक्यांच्या अनागोंदी कारभाराबद्दल आंदोलन उभारले होते. महाराष्ट्रातील ६० पेक्षा अधिक टोलनाके त्यांनी बंद पाडले. हे टोलनाके सामान्य जनतेची लूट करत असल्याने, ते बंद पाडणंच योग्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! चीनचा पराभव, ४४ वर्षांनंतर हॉकीत सूवर्णपदक

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT