Raj Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

MNS Pune: मनसेची पुणे लोकसभेसाठी तयारी सुरू, 'या' बड्या नेत्यावर सोपवली जबाबदारी

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील मोठी तयारी सुरु केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना जबाबदारी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान अमित ठाकरे यांनी देखील पुणे लोकसभेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. अमित ठाकरे यांचे पुणे दौरे देखील वाढले आहेत. अशातच अमित ठाकरे पुन्हा दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहे. ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी अमित ठाकरे पुण्यात आहेत. या दौऱ्यात ते प्रभागनिहाय आढावा घेणार आहे. त्यासाठी आज आणि उद्या मनसेच्या बैठकीचं सत्र आयोजित करण्यात आलं आहे.

मनसेकडून लोकसभा निवडणुकीबरोबर मनपा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठीची चाचपणी अमित ठाकरे करणार आहे.

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून माजी नगरसेवक वसंत मोरे देखील इच्छुक आहेत. त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मनसे कार्यकर्ते वसंत मोरे यांना भावी खासदार म्हणून सातत्याने उल्लेख करतात.

तर पुणे मनसे शहरध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामुळे कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर

मनसे नेते अमित ठाकरे यांचा पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आज आणि उद्या पुण्यात प्रभाग निहाय आढावा बैठक घेणार आहेत. अमित ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी देखील बैठका घेणार आहेत. पुणे लोकसभेची जबाबदारी मनसेकडून अमित ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आज आणि उद्या पक्ष कार्यालयात बैठका घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT