महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंनी दादांच 'ते' आव्हान स्विकारलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा या आठवड्याच्या शेवटी होणार आहे.

धनश्री ओतारी

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा या आठवड्याच्या शेवटी होईल. ही सभा नदीपात्राऐवजी सभागृहात होणार आहे. तसेच यासंदर्भात अधिक माहिती राज ठाकरे ट्विट करत देतील अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक सभेत राज ठाकरे यांना दिवसा सभा घेण्याच आव्हान दिले होते. दादांचे हे आव्हान राज ठाकरेंनी स्विकारलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दोन आठवड्यापूर्वी अजित पवारांनी नाशिकमध्ये घेतलेल्या सभेत राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना भर दुपारी सभा घेण्याचे आव्हान दिलं. 'आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दूपारी सभा घेतली का असा सवाल अजित पवार यांनी केला.

कधी कष्ट घेतले आहेत का? यांची सभा कधी संध्याकाळी. उगीच लोकांची दिशाभूल करायची, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरु आहे. चांगले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे', असे अजित पवार म्हणाले.

पवारांच्या या आरोपानंतर राज ठाकरे यांनी थेट पुण्यात सभा आयोजित केली आहे. ती सभगृहात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. मात्र, हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल.

यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे.

राज ठाकरेंनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यापूर्वी पुण्यात सभा घेऊन रणशिंग ते फुंकणार असल्याचं बोललं जात होतं. डेक्कन भागातील भिडे पुलाजवळील नदी पात्रात ही सभा घेणार असल्याचं मनसेकडून जाहीरही करण्यात आलं होतं. मात्र, आता ही सभा सभागृहात होणार आहे. कार्यकर्त्यांनी या सभेसाठी तयारीही सुरु केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT