महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : सकाळी भेट अन् संध्याकाळी टोमणा; ''एकनाथ शिंदे म्हणजे 'वडापाव'मधला वडा...''

संतोष कानडे

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या प्रश्नासंबंधी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. सकाळी सविस्तर चर्चा झाली खरी मात्र सायंकाळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोमणा लगावला. काही झालं तरी ठाकरी बाणा कायमच असल्याचं यातून दिसून आलं.

शनिवारी गोरेगाव येथील वडापाव महोत्सवासाठी राज ठाकरेंची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अशोक वैद्य यांचा वडापाव आज लंडनमध्ये पोहोचला आहे. सचिन तेंडुलकर यांचे गुरु आचरेकर सचिनला शिकवताना एक रुपया स्टंपवर ठेवायचे आणि तो पडला नाही पाहिजे असं सांगून संध्याकाळी त्याला तो रुपया वडापासाठी द्यायचे. दिवसभर रुपया पडू न देता सचिन तेंडुलकर संध्याकाळी वडापाव खायचा.

वडापावची महती सांगताना त्यांनी विद्यमान सरकारवरही टीका केली. राज ठाकरे म्हणाले, वडापाव पाहिला की मला राज्य सरकारची आठवण येते. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मधला वडा अजित पवार आहे का? की अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या मधला वडा एकनाथ शिंदे आहेत... की आणखी वेगळं! असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचं ट्वीट

आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारतर्फे मंत्री महोदय दादा भुसे ह्यांच्यासोबत माझ्या घरी 'शिवतीर्था'वर एक बैठक झाली होती. त्या बैठकीत 'नागरिकांकडून होणारी अमाप टोलवसुली, टोलनाक्यांमधून होणाऱ्या रहदारीचं सर्वेक्षण ह्या संबंधीची माहिती आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहचवू' असं मी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, त्या टोलविषयीची माहिती तसंच 'सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठी पाट्यांचा आदेश आणि कायदा पायदळी तुडविणाऱ्यांना वेळीच कडक शासन करावं' ह्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

माझ्यासोबत पक्षाचे नेते व आमदार राजू पाटील हेही उपस्थित होते, त्यांनीही आपल्या मतदारसंघातील आणि महानगरातील महत्त्वाचे विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. सर्वच मुद्द्यांचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकार सकारात्मक पावलं उचलेल ही अपेक्षा.

राज ठाकरेंनी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या होत्या. तर संध्याकाळी मात्र चिमटा काढत त्यांनी वडापावमधल्या वड्याची उपमा मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांच्या या कोपरखळीची चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT