Sandeep Deshpande Bail e sakal
महाराष्ट्र बातम्या

...तर मी राजकारण सोडेन; संदीप देशपांडेंचं ठाकरे सरकारला आव्हान

अटकपूर्व जामीन झाल्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : अटकपूर्व जामीन झाल्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. आणि आम्ही सरकारविरोधी बोलू नये, आमचे थोबाडं बंद राहावेत यासाठी आमच्यावर खोटे आरोप दाखल केल्याचा आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला.

(MNS Sandeep Deshpande Press Conference)

नेते संदीप देशपांडे यांच्यावर महिला पोलिसांना धक्का दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतील सभेच्या नंतर निर्माण झाल्याच्या तणावाच्या वातावरणात मनसे नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेताना त्यांनी महिला पोलिसांना धक्का लावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यानंतर त्यांना आता कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी माध्यमांचे आभार मानले आहेत. "तुम्ही दाखवलेल्या फूटेजवरून आम्ही कसलाही गुन्हा केला नाही हे स्पष्ट झालं, त्यामुळे मी तुमचं आभार मानते." असं ते म्हणाले. "मी जर धक्का लावल्याचं तुम्ही दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन." असं आव्हान त्यांनी केलं आहे.

शिवसेना आणि हे सरकार सूडाचे राजकारण करत आहे हे सांगताना त्यांनी गांधीजींच एक उदाहरण दिलं. "मी घरी नसताना माझे मुलं आणि बायको घरी असताना तुम्ही पोलिस पाठवता हे तुम्हाला पटतं का? आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचे येतील." असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात रविवारी सभा होणार आहे. त्याआधी मनसेने राज ठाकरे यांचा आयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. त्यामुळे राज ठाकरे पुण्यातील सभेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तसंच नेते संदीप देशपांडे यांनी मी जर महिलेला धक्का लावला असेल तर राजकारण सोडेन असं आव्हान केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT