Uddhav Thackeray and Raj Thackeray News 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : राज ठाकरेंनी दोनदा पाऊल पुढं टाकलं, पण…; राज-उद्धव युतीवर मनसे नेत्याचं वक्तव्य

रोहित कणसे

Uddhav Thackeray Latest Update : अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेत झाल्याल्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात देखील उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान या राजकीय भुकंपामुळे महाविकास आघाडीचं पुढे काय होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. यातच आता तरी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांनी एकत्र यावं अशी साद मनसे कार्यकर्त्यांकडून घालण्या आली. यादरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करणार का? असा प्रश्न संदीप देशपांडे यांना विचारण्यात आला होता. याला उत्तर देताना मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला आदेश येतात तसं मी काम करतो. सध्या मला स्वबळाचा आदेश देण्यात आला आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

२०१४ किंवा २०१७ या दोन्ही वेळा राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्यांनी सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्याकडून (उद्धव ठाकरे गट) टाळाटाळ केली गेली. हो की नाही हे उत्तर पण दिलं नाही आणि अचानक माघार घेतली, असे संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

पक्षाचं नेतृत्व काय विचार करतं यासोबत लोकं काय विचार करतात हे पाहणं महत्वाचं असतं. युती-आघाडी या गोष्टी गरजेतून घडत असतात, तशी गरज आहे की नाही याचा विचार प्रत्येक पक्षाचं नेतृत्व करत असतं असेही देशपांडे म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर शिवसेना भवनाबाहेर लावण्यात आले होते. या बॅनरवर "महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला. राजसाहेब - उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे" अशी साग घालण्यात आली होती.

दरम्यान या बॅनरमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा देखील जोरात सुरू आहेत. दरम्यान याबद्दल उद्धव ठाकरे काही भूमिका घेणार का याकडे देखील दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT