Sambhaji Bhide Controversy  
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Bhide Controversy: ...तर मी कुंकू लावणार नाही; संभाजी भिडे प्रकरणावर शालिनी ठाकरे स्पष्टच बोलल्या

सकाळ डिजिटल टीम

कायम आपल्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे हे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आल्यानंतर संभाजी भिडे यांच्याशी एका महिला पत्रकारानं संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेनं अशा शब्दांत भिडे यांनी बोलण्यास नकार दिला. यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सक्ती केली तर मी..

भिडे यांच्या या वक्तव्यानंतर सामजिक आणि राजकीय स्तरामधून प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. "मी कुंकू - टिकली लावते. गेल्या काही वर्षांपासून तर मोठे कुंकू लावते. कारण मला आवडते." असे म्हटले आहे. पुढे शालिनी ठाकरे म्हणाल्या की, "...पण उद्या जर मला कुणी कुंकू किंवा टिकली लावण्याची सक्ती केली तर मी लावणार नाही!"

हेही वाचा : राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

नेमकं झालं काय होतं?

एका महिला पत्रकारानं संभाजी भिडेंना प्रश्न विचारला की, "तुम्ही आज मंत्रालयात आला होतात तुम्ही कुणाची भेट घेतली?" यावर भिडे म्हणाले होते की, "तू आधी टिकली लावं, मग तुझ्याशी बोलेन. आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाहीए. तू कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो". यावरून वाद पेटला असून अनेक जणांकडून संभाजी भिडे यांच्यालक टीका करत आहेत.

'तू कुंकू लाव...' प्रकरण भिडेंना भोवणार?

दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना त्यांच्या भूमिकेचा खुलासा करण्यास सांगितले आहे. महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तुत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro Fare Hike: प्रवाशांचा खिसा रिकामा होणार? मेट्रोवर भाडेवाढची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव पाठविला, कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Midday Meal Rice Theft : माध्यान्ह पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत होते, ग्रामस्थांनी ट्रक अडवला अन्; मुख्याध्यापकचं निघाला चोरटा

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अजित पवार ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल

iPhone Air ला टक्कर द्यायला आला रीयल किंग? 'या' कंपनीने लॉन्च केला सर्वांत स्लिम 5G मोबाईल, किंमत एवढी कमी की बघताच खरेदी कराल

SCROLL FOR NEXT