dilip dhotre, pandharpur solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणूक खर्चात ‘मनसे’चे दिलीप धोत्रे अव्वल! दुसऱ्या क्रमांकावर माढ्याचे अपक्ष रणजित शिंदे; सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी निवडणुकीत किती केला खर्च? वाचा...

विधानसभेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निकालापर्यंत उमेदवाराचा खर्च ग्राह्य धरला जातो. आत्तापर्यंत निवडणूक खर्चामध्ये पंढरपुरातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे जिल्ह्यात सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार ठरले आहेत.

प्रमोद बोडके,

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता. २३) मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून ते निवडणूक निकालापर्यंत उमेदवाराचा खर्च ग्राह्य धरला जातो. आत्तापर्यंत झालेल्या निवडणूक खर्चामध्ये पंढरपुरातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे हे जिल्ह्यातील सर्वाधिक खर्च करणारे उमेदवार ठरले आहेत. त्या पाठोपाठ माढ्यातील अपक्ष उमेदवार रणजित शिंदे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना ४० लाखांपर्यंत खर्च करण्याची परवानगी असते. या खर्चाचा हिशोब त्यांना वेळोवेळी व विहित नमुन्यात सादर करावा लागतो. निवडणुकीच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी संनियंत्रण समिती कामकाज करते. आत्तापर्यंत तीन वेळा या समितीने खर्चाची पडताळणी केली आहे. या पडताळणीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पहिल्या दोन उमेदवारांचा खर्च...

  • करमाळ्यात अपक्ष उमेदवार रामदास झोळ यांचा २१ लाख २० हजार २८३ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण पाटील यांचा खर्च २० लाख ९८ हजार २९ रुपये झाला आहे.

  • माढ्यातील अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा खर्च २४ लाख ९२ हजार ११७ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मीनल साठे यांचा खर्च १८ लाख ९४ हजार ८३० रुपये एवढा झाला आहे.

  • बार्शीतील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा खर्च १६ लाख १९ हजार ५३६ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप सोपल यांचा खर्च १२ लाख २३ हजार ८११ रुपये एवढा झाला आहे.

  • मोहोळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार यशवंत माने यांचा खर्च २३ लाख २५ हजार २३५ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांचा खर्च १९ लाख ५८ हजार ७११ रुपये झाला आहे.

  • सोलापूर शहर उत्तरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांचा खर्च चार लाख ६७ हजार ४६ रुपये एवढा तर भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचा खर्च आठ लाख २६ हजार ११९ रुपये झाला आहे.

  • शहर मध्यचे एमआयएमचे उमेदवार फारुक शाब्दी यांचा खर्च १७ लाख १७ हजार १०९ रुपये तर माकपचे उमेदवार नरसय्या आडम यांचा खर्च १२ लाख २५ हजार ९६४ रुपये झाला आहे.

  • अक्कलकोटचे भाजप उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांचा खर्च ११ लाख ५५ हजार ८५५ तर काँग्रेस उमेदवार सिद्धाराम म्हेत्रे यांचा खर्च दहा लाख १७ हजार १९६ एवढा झाला आहे.

  • सोलापूर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांचा खर्च ११ लाख १० हजार ८१३ रुपये तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांचा खर्च १३ लाख ८८ हजार ८०७ रुपये झाला आहे.

  • पंढरपुरातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा खर्च २५ लाख ८९ हजार ४४० रुपये तर काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा खर्च १७ लाख ४७ हजार ७९७ रुपये झाला आहे.

  • सांगोल्यातील शिवसेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांचा खर्च १८ लाख ४२ हजार ३२३ रुपये तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दीपक साळुंखे यांचा खर्च १७ लाख ५२ हजार १९९ रुपये एवढा झाला आहे.

  • माळशिरसमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांचा खर्च १७ लाख ८ हजार अठरा रुपये तर भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा खर्च ११ लाख ५९ हजार ३०६ एवढा झाला आहे.

२६ व्या दिवशी होणार खर्च अंतिम

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर २६ व्या दिवशी होणाऱ्या बैठकीत समितीच्या वतीने उमेदवारांचा खर्च अंतिम केला जातो. तोपर्यंत उमेदवारांना खर्चाचे पुरावे, खर्चाची रक्कम कमी, अधिक असल्याबाबत म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाते. यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी फक्त १४ दिवसांचा कालावधी मिळाला. या कालावधीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोचण्यासाठी अनेक संकटांना पार करावे लागल्याचे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT