सोयाबीन 
महाराष्ट्र बातम्या

सोयामीलबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; सोयाबीन उत्पादकांना फटका

स्नेहल कदम

भाजप सरकारच्या या निर्णयाचा देशातील सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे.

मुंबई - सोयामीलबाबात मोदी सरकारने (modi government decision) मोठा निर्णय घेतला आहे. बारा लाख टन जनुकीय बदल केलेल्या डीओसीच्या (DOC) सोयाबीन आयातीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजप सरकारच्या या निर्णयाचा देशातील सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसणार आहे. (soya meal)

गेल्या दोन आठवड्यांमध्ये दहा हजार रुपये क्विंटलवर गेलेल्या सोयाबीनचे भाव आता दोन हजार रुपयांनी घसरले आहेत. देशामध्ये दरवर्षी 80 ते 85 लाख मेट्रिक टन डीओसीचं उत्पादन होते. देशांमध्ये वर्षभरात अंदाजे 50 लाख मेट्रिक टन सोयाबीनची गरज असते. सध्या देशामध्ये अतिरिक्त सोयामिल असताना सरकारने बारा लाख टन सोयाबीनच्या आयातीला परवानगी दिलेली आहे. तर 31 ऑक्टोबरपर्यंत याची खेप येणार आहे. सोयाबीन कापणी हंगाम तीन आठवड्यांवर आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे निवड प्रक्रिया उद्योग आणि शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. येणाऱ्या दोन-तीन आठवड्यानंतर सोयाबीनची कापणी होईल. गरज नसतानाही सरकारने हा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न आता सोयाबीन उत्पादकांकडून विचारला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कॅफेबाहेर खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आरोपीला अटक

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT