महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या नेत्याची खासदारकी रद्द, सचिवालयाने घेतला निर्णय

राष्ट्रवादीची पॉवर कमी

रुपेश नामदास

Mohammed Faizal: लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. फैजल याचं ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली.

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात खासदाराला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना 2009 सालची आहे. बुधवारी कावरट्टी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने राष्ट्रवादीचे खासदार आणि अन्य आरोपींच्या जामीनालाही स्थगिती दिली. त्यानंतर तेथून त्यांना केरळमधील कन्नूर सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले.

मात्र, फैजल यांनी या शिक्षेविरोधात केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचवेळी न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

काय आहे प्रकरण?

फिर्यादीनुसार, खासदाराने कथितपणे लोकांच्या गटाचे नेतृत्व केले आणि वादानंतर माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद सलिया यांना गंभीर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फैजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांना नंतर केरळला नेण्यात आले आणि त्यांच्यावर अनेक महिने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या खटल्यात एकूण 32 आरोपी होते आणि पहिल्या चार जणांना शिक्षा झाली होती.

खासदार हे या प्रकरणातील दुसरे आरोपी होते. मात्र, ही किरकोळ बाचाबाची असल्याचे आरोपींच्या वकिलांनी ठामपणे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Government Job Fraud : एकाच वेळी दोन-दोन सरकारी नोकऱ्या करत होता पठ्ठ्या, ३३ वर्षे घेतला पगार; कोर्टाने सुनावली ७ वर्षांची शिक्षा

हे, भाऊ शोभतात! बांगलादेशचे दोन्ही फलंदाज एका दिशेला, पाकिस्तानच्या खेळाडूंनी काय केलं पाहा Video Viral

Government Stray Dog Policy : शिकवायचं की कुत्री मोजायची? आता भटक्या कुत्र्यांची जबाबदारी शिक्षकांवर? सरकारचा अजब फतवा, काय आहे नेमका प्लॅन?

Latest Marathi News Live Update : एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईची झळ आता गडचिरोली शहराला

स्टार प्रवाहच्या प्रसिद्ध मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट, म्हणाल्या...'गेली दोन वर्ष मी...'

SCROLL FOR NEXT