महाराष्ट्र बातम्या

Aryan Khan Case - राष्ट्रवादीचा सुनिल पाटील सूत्रधार; भाजपचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

किरण गोसावी, मनिष भानुषाली कोण, ड्रग्ज प्रकरणाशी त्यांचे कनेक्शन कसे? हे सांगताना या सर्वाचा सूत्रधार सुनिल पाटील असल्याचं भाजप नेते मोहित कंबोज यांनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सांगितले.

एनसीबीवर आरोप हे मलिकांचे षडयंत्र आहे. आतापर्यंत या प्रकरणी अनेकांची नावे समोर आले. हे आरोप करताना किरण गोसावी, प्रभाकर साईल किंवा मनिष भानुषाली यांची नावे घेतली गेली. मात्र यांचा सूत्रधार सुनिल पाटील असून तो राष्ट्रवादीशी संबंधित आहे असा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला. भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आर्यन खानसोबत किरण गोसावीच्या सेल्फीचा फोटो, तसंच आर्यनला घेऊन जात असलेले फोटो दाखवले. तसंच किरण गोसावी हा भाजपशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र कोण किरण गोसावी, मनिष भानुषाली कोण, ड्रग्ज प्रकरणाशी त्यांचे कनेक्शन कसे? हे सांगताना या सर्वाचा सूत्रधार सुनिल पाटील असल्याचं मोहित कंबोज यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी सुनिल पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबधित असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचे ३० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहेत. ते फक्त संबंध नाहीत तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली त्यांच्या मुलाचा खास मित्र आहे. राज्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा तो घरचा सदस्य आहे असा दावाही मोहित कंबोज यांनी केला.

मी कोणतेही आरोप करत नाही तर सत्य सांगत आहे असं म्हणत मोहित कंबोज यांनी म्हटलं की, अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईमध्येही सुमित पाटीलचा रोल आहे. १९९९ पासून २०१४ पासून सुनिल पाटील आणि त्याचे गँग सक्रीय होते. २०१४ ला सरकार बदलल्यानंतर तो अंडरग्राउंड झाला. सरकार पुन्हा आल्यानंतर त्याचे गँग सक्रीय झाले. बदलीचे रॅकेट असेल किंवा इतर गोष्टी यातही त्याचा हात आहे. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांशी त्याचे संबंध आहेत.

आर्यन खान प्रकरणाशी त्याचा काय संबंध?

सुनिल पाटीलने सॅम डिसूझाला व्हॉटसअॅप मेसेज आणि कॉल केला. माझ्याकडे २७ लोकांची माहिती आहे आणि तुम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांची माहिती द्या. मला त्यांना सांगायचे आहे असं सॅम म्हणाला. सॅम डिसूझाने एनसीबीमधील व्ही व्ही सिंग यांच्याशी चर्चा केली. मुंबईतील ड्रग्ज आणि क्रूज पार्टीची माहिती त्यांना दिली आणि पुन्हा सुनिल पाटीलला व्हीवी सिंग यांच्याशी बोलणं झालं हे सांगितलं.

सुनिल पाटीलनेच किरण गोसावीचा नंबर सॅम डिसूझाला पाठवला. किरण गोसावी पूर्ण माहिती व्हीव्ही सिंग यांना देईल असं सॅम डिसूझाला सांगितलं. आता हा प्रश्न आहे की, एनसीपीचे संस्थापक सदस्याकडे ड्रग्ज माफियाची माहिती त्याच्याकडे कशी आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Inside Story : बस थांब्याजवळ शेकोटी करून उभारले...अन्‌ तिघांच्या आयुष्यातील शेवटचा थांबा ठरला, एकाच वेळी तीन कुटुंब उद्ध्वस्त

इतिहासाला झळाळी देणारे नाव विश्वास पाटील

Paush Purnima 2026: 2 कि 3 जानेवारी? यंदा वर्षातील पहिली पौर्णिमा कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त

रोहित शर्मा, विराट कोहली यांनी खेळणं सोडलं तर काय होईल? R Ashwin च्या धक्कादायक दाव्याने क्रिकेटविश्वात खळबळ

Taurus Horoscope 2026 : घर-जमीन खरेदीसाठी अनुकूल काळ, शनीच्या कृपेने वृषभ राशीला लाभाचा मार्ग, पण..; या लोकांसाठी कसं असेल नवीन वर्ष?

SCROLL FOR NEXT