Mohit Kamboj Social Media Post Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: '...अन्यथा तुमचं सरकार अडचणीत येईल', भाजप नेत्याचा CM शिंदेंना इशारा, म्हणाले 'हीच योग्य वेळ...'

Mohit Kamboj Social Media Post: आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे भाजप नेते मोहित कंबोज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मिडीया एक्सवरती एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असणारे भाजप नेते मोहित कंबोज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मिडीया एक्सवरती एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. पोस्टमध्ये कंबोज यांनी मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सगळे रेकॅार्ड तोडत आहे. महानगरपालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तात्काळ नोटीस द्या. भ्रष्टाचार कंट्रोल करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्याचबरोबर एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल, असं आपल्या पोस्टमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स या सोशल मिडियावर मुंबई महापालिकेतील (BMC) अतिरिक्त आयुक्तांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलेला आहे. कंबोज यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह उघड करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कंबोज यांच्या पोस्टनंतर मुंबई महानगरपालिकेतील तो अधिकारी नेमका कोण आहे याबाबतची जोरदार चर्चा सध्या सुरु झाली आहे.

मोहित कंबोज यांनी काय लिहंलय आपल्या पोस्टमध्ये ?

मुंबई महानगरपालिकेतील एक AMC भ्रष्टाचाराचे सर्व रेकॅार्ड तोडत आहे. महानगरपालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ नोटीस द्या. या एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्याचे तोंड म्हणजे गटार आहे. त्याला कंट्रोल करण्याची ही योग्य वेळ आहे, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग केले आहे.

लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार, त्यामध्ये सांगणार नाव

मोहित कंबोज यांनी पुन्हा एक पोस्ट करत पुढे म्हटले आहे की, महानगरपालिकेतील या भ्रष्ट अधिकाऱ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणार तक्रार आहे. या अधिकाऱ्याचे नाव पुराव्यासह देणार आहे. कंबोज यांच्या पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली असून तो अधिकारी नेमका कोण याची जोरदार चर्चा सुरु आहे.मात्र, अद्याप एकनाथ शिंदेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT