sunil patil esakal
महाराष्ट्र बातम्या

आर्यन खान प्रकरणी मास्टरमाइंडचा आरोप असलेले सुनील पाटील कोण?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: सुनील पाटील (sunil patil) हेच आर्यन खान प्रकरणाचे (Aryan Khan drugs case) मास्टर माइंड असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज (bjp mohit kambhoj) यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच पाटील यांचे राष्ट्रवादीशी कनेक्शन असल्याचा दावा मोहीत कंबोज यांनी केला आहे. नेमके कोण आहेत हे सुनील पाटील?

सुनील पाटील रॅकेट चालवत असल्याचा आरोप

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहेत, आज भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंडच सुनील पाटील आहे, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेत सॅम डिसुझाचा व्हिडीओ देखील दाखवला. त्यामध्ये सॅम डिसुझाचा व्हिडीओ, सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील व्हॉटसअप चॅट शेअर करत सुनील पाटीलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं, असा दावा कंबोज यांनी केला. तसेच सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचं राज्यभरात बदल्यांचं रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात. पाटील यांचे गृहमंत्र्यांशी कनेक्शन कसे? असा सवाल त्यांनी केला आहे.

असे आहे सुनील पाटील व राष्ट्रवादीचे कनेक्शन

आर्यन खान प्रकरणाचे (Aryan Khan drugs case) मास्टर माइंड सुनील पाटील असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज (bjp mohit kambhoj) यांनी केला. पण हे सुनील पाटील नेमके आहेत तरी कोण? सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे रहिवाशी आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे मित्र आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत. सुनील पाटील हे धुळ्याचे असले तरी ते मुंबईतच राहतात. गुजरात आणि दिल्लीतही त्यांचं वास्तव्य असतं. अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकारण्यांशी त्यांचे संबंध आहेत. सुनील पाटील यांचा मंत्रालयात सहज वावर असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT