monsoon 2023 has set in over kerala today information given by imd tamilnadu maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : अखेर मॉन्सून केरळात दाखल; भारतीय हवामान विभागाकडून मोठी अपडेट

केरळात मॉन्सून दाखल झाले असून देशात मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) तब्बल सात दिवस उशिराने, पण केरळात आगमन झाले आहे. मॉन्सूनने दक्षिण तामिळनाडू आणि केरळचा बराचसा भाग गुरुवारी (ता. ८) व्यापला आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी जाहीर केले.

केरळात मॉन्सून दाखल झाले असून देशात मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस आता सुरुवात झाली आहे. सध्या मॉन्सूनने केरळचा बहुतांश भाग, दक्षिण तामिळनाडू, दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, ईशान्य आणि मध्य बंगालच्या उपसागराचा भाग व्यापले आहे.

दरम्यान पुढील ४८ तासात संपूर्ण केरळसह तामिळनाडू, कर्नाटक, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखीन काही भागात मॉन्सून प्रगती करेल. असे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.

साधारणपणे मॉन्सून १ जूनपर्यंत (दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार) केरळमध्ये दाखल होतो. तर गेल्या १६ मे रोजी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार मॉन्सून ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणार होते व त्यात चार दिवसांची तफावत होईल, असे ही नमूद करण्यात आले होते.

मात्र त्यास विलंब झाला असून प्रत्यक्षात गुरुवारी (ता. ८) केरळमध्ये मॉन्सूनने आगमन केले आहे. त्यामुळे यंदा मॉन्सूनने ७ दिवस उशिराने देशाच्या भूभागात केरळमध्ये प्रगती केली. या आधी २०१९ मध्ये ही ८ जूनला मॉन्सून केरळातील पोहोचले होते.

पुढील अंदाज

- मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण

- पुढील दोन दिवसात संपूर्ण केरळ व्यापण्याची शक्यता

- तसेच मध्य अरबी समुद्र, तामिळनाडूचा आणखी काही भाग, कर्नाटक आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसेच ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता

मागील तीन वर्षातील स्थिती केरळ मध्ये मॉन्सूनचे आगमन

वर्ष : दाखल होण्याचा अंदाज : प्रत्यक्षात दाखल झाले

२०२१ : ३१ मे : ३ जून

२०२२ : २७ मे : २९ मे

२०२३ : ४ जून : ८ जून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT