monsoon Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Alert: उद्या राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

राज्याला सतर्कतेचा इशारा.

सुधीर काकडे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं चांगलाच जोर धरल्याचं पाहायला मिळतं आहे. सप्टेंबर अखेरिस सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता पुन्हा एकदा राज्यात ९ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस. होसळीकर यांनी दिली आहे.

राज्यात मागच्या काही काळापासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच मराठवाड्यात या पावसामुळे शेतकऱ्यांची सगळी पिकं पाण्यात गेल्याचे पाहायला मिळाले. हवामान विभागातील शास्त्रज्ञ के.एस. होसळीकर यांनी आता पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. "फार क्वचित वेळा असे चित्र दिसते कि संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट सहित पाऊस पडण्याची शक्यता.." अशी माहिती के.एस. होसळीकर यांनी दिली आहे.

दरम्यान, येत्या 4,5 दिवसात राज्यात काही ठिकाणो गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, गडगडाट होत असताना व विजा चमकत असताना कृपया बाहेर जाणे टाळा किंवा योग्य आसरा घ्या असे आवाहन देखील होसळीकर यांनी यावेळी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

पत्नीच्या खून प्रकरणी पती-सासऱ्यासह ८ जण तुरुंगात गेले, १२ वर्षांनी जिवंत सापडली महिला

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

SCROLL FOR NEXT