महाराष्ट्र बातम्या

मॉन्सून शनिवारपर्यंत अंदमानात; यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज

प्रतिनिधी

पुणे - बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात उद्या (ता.१३) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळणार आहे. शनिवारपर्यंत (ता.१६) मॉन्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती असल्याची माहिती हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सून आगमनाच्या संभाव्य तारखांच्या नवीन वेळापत्रकानुसार मॉन्सून केरळमध्ये १ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. 

दक्षिण अंदमान समुद्र, सुमात्राच्या किनाऱ्यालगतच्या परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, उद्या (ता.१३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तरेकडे सरकणार असून, शनिवारपर्यंत (ता.१६) ही प्रणाली अधिक तीव्र होणार आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती पोषक ठरणार आहे. दिर्घकालीन सर्वसामान्य वेळेनुसार मॉन्सून २० मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होत बहुतांशी भाग व्यापतो. यंदा सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस आधीच मॉन्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी १८ मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपुर्ण अंदमान बेटे व्यापण्यास ३० मे उजाडला होता. 

मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून हंगामाचा सुधारित दिर्घकालीन अंदाज व विभागानिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे. 

यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज 
यंदा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा १०० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १५ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरवातीला एल-निनो स्थिती सर्वसामान्य राहणार असून, शेवटच्या टप्प्यात ला-निना स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Prices Soar : आळेफाटा उपबाजारात कांद्याला किलोला ४२ रुपये उच्चांकी दर; आवक वाढली तरी भावात उसळी, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

SCROLL FOR NEXT