Monsoon assembly session maharashtra starts today congress leader of opposition list in Vidhan sabha  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या दुसऱ्या फळतील नेत्यांना संधी; 'ही' नावे चर्चेत

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. मात्र राष्ट्रवादीचे ९ आमदार सत्तेत सहभागी झाल्याने विरोधकांची बाजू थोडी कमकूवत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र विरोधकांकडून अद्यापही विरोधी पक्षनेता कोण असेल याबद्दल स्पष्टता नाहीये. यापूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेकडे होते, मात्र पक्षातील फूटीनंतर सभागृहातील सदस्यसंख्येनुसार काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगू शकते. यादरम्यान या पदासाठी काही संभाव्य नेत्यांची नावे समोर आली आहेत.

विधान सभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांची नाव चर्चेत आहेत. या संबंधीत दिल्लीत पक्षाच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. यानंतर काँग्रेसमधील दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. या पदासाठी नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची नाव चर्चेत होती. पण ही नावे मागे पडून दुसऱ्या फळीतील नेत्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणाकडे किती सदस्यसंख्या?

महाराष्ट्र विधानसभेत ऐकूण २८६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपकडे सर्वात अधिक १०५ आमदार आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. सरकारला इतरही २० आमदारांचं समर्थन आहे. तर अजित पवार यांच्यासोबत आतापर्यंत २४ आमदार गेले आहेत. त्यामुळे सत्तापक्षाकडे आतापर्यंत १८९ आमदारांचं समर्थन आहे.

तर विरोधकांबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत ४४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे फक्त १५ आमदार उरले आहेत. तर शरद पवार गटाकडे १४ आमदार शिल्लक आहेत. राष्ट्रवादीच्या १५ आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT