Eknath Shinde and Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : राज्यात 'कॅसिनो' नकोच! नव्या विधेयकातून हा विषय कायमचा संपवण्याच्या हालचाली

संतोष कानडे

मुंबईः राज्याचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालेलं आहे. या अधिवेशनात राज्यात कॅसिनो सुरु करण्याबाबत पावलं उचलण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. परंतु कॅसिनोचा विषय संपण्यासाठीय नवीन विधेयक येत असल्याचं कळतंय.

पावसाळी अधिवेशनात एकूण २४ विधेयके आणि ६ अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र 'कॅसिनो' नियंत्रण व कर सुधारणा विधेयकाचा समावेश असल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु कॅसिनोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पूर्वीच विरोध केलेला आहे.

1976 पासून हे विधेयक अस्तित्त्वात असून कॅसिनो हा विषय कायमचा संपविण्यासाठी हे नवीन विधेयक आणण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी सुस्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि त्यानुषंगाने हे विधेयक आणण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी 'साम टीव्ही'ला दिली आहे.

1976 पासून हा कायदा अस्तित्त्वात असल्याने कॅसिनो सुरु करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जातात आणि कॅसिनो सुरु करण्याची परवानगी मागतात. महाराष्ट्रात कुठल्याही स्थितीत कॅसिनो सुरु होऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना घेतली असल्याची माहिती आहे.

त्यामुळे हा कायदाच खारीज करण्याचे निर्देश गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि त्यानुसारच, हे विधेयक आणण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT