Rahul Narvekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena News : शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडणार? ४० आमदारांनी मागितली मुदतवाढ

रोहित कणसे

शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे. विधीमंडळाच्या नोटीसीला उत्तर देताना ही मुदतवाढ मागण्यात आली आहे.

विधिमंडळाकडून शिवसेनेच्या आमदारांना अपत्रतेसंबंधी नोटीस पाठवण्यात आली होती. आणखी १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे बाकी असून सध्या विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने या आमदारांना आता किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काल विधिमंडळात बैठक झाली विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांमध्ये झालेल्या या बैठकीत आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयावर चर्चा झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी त्या नोटीसीला उत्तर दिलं आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुदत वाढवून मागितल्याचे समोर आलं आहे.

तर उद्धव ठाकरे गटातील १४ आमदरांच्या उत्तरांचा आढावा घेणं अद्याप बाकी आहे. दरम्यान सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामुळे इतर कामकाज होत नसल्याने या आमदारांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT