Rain Updates in Maharashtra | Weather Forecast
Rain Updates in Maharashtra | Weather Forecast sakal
महाराष्ट्र

मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर; यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस बरसणार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मॉन्सूनबाबत (Monsoon) एक आनंदवार्ता असून यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीतील हा पावसाचा पहिलाच अंदाज भारतीय हवामान खात्यानं (IMD) जाहीर केला आहे. पावसाची ही टक्केवारी म्हणजेच यंदा चांगला पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Monsoon good news this year 99 percent of the average rainfall will fall)

पावसाची ही वार्ता शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. सरासरीच्या ९९ टक्के पाऊस म्हणजे २०२० पर्यंत गेल्या पन्नास वर्षांपर्यंतचं पाऊसमान काढलं तर ते साधारण ८६८ मीमीटर इतकं आहे. याच्या सरासरी ९९ टक्के म्हणजे हा सर्वसाधारण पाऊस मानला जातो. त्यामुळं यंदाचा पाऊस चांगला असेल असं सांगितलं जात आहे.

IMD_Delhi

वर्षभरात जो पाऊस पडतो त्यांपैकी ७४ टक्के पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यात पडतो. त्यामुळं हा पाऊस शेतकऱ्यांसाठी चांगला मानला जातो. त्यामुळं हे चार महिने फक्त शेतकऱ्यांसाठी तर भारतीयांसाठी चांगले मानले जातात. सध्या जर चांगला पाऊस राहिला तर सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसून येऊ शकते म्हणून तो दिलासादायक ठरेल असं मानलं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

SCROLL FOR NEXT