मुंबई - महाराष्ट्रासाठीची 'ती' आनंदाची बातमी अखेर मुंबईतून समोर येतेय. कारण यंदाचा मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक कृष्णानंद होसळीकर यांनी याबाबत माहिती दिलीये. येत्या ४८ तासात मान्सून पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
देवभूमी केरळातून भारतातील मान्सूनची वाटचाल सुरु होते. केरळातून कर्नाटक आणि पुढे महाराष्ट्र असा मान्सूनचा प्रवास असतो. अशात पुढील २ दिवसात मान्सून महाराष्ट्रात आणखी पुढे सरकेल असं होसळीकर यांनी म्हटलंय.
१ जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला. त्यानंतर ११ तारखेला म्हणजेच आज हर्णे बंदरातून आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय. मुंबई आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून पावसाच्या सरी बरसतायत. एकंदर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण असल्याने मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होणार आहे. मुंबईतील कुलाबा वेधशाळेचे संचालक होसळीकर यांनी याबाबत माहिती दिलीये.
एकंदरच मान्सूनच्या समाधानकारक वाटचालीमुळे महाराष्ट्रातील बळीराजा आणि महाराष्ट्रातील नागरिक सुखावलेत.
monsoon has arrived in maharashtra information by krushnanand hosalikar
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.