Weather esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Rain : घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त ढग आणि राज्याच्या उत्तर पूर्वेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त ढग आणि राज्याच्या उत्तर पूर्वेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, तर घाटमाथ्यावर तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्या वर्तवली आहे.

बुधवारी (ता.२८) दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. तर अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे शहरातील सरासरी तापमानात कमालीचे घटले असून, कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

शनिवार (ता.१) पर्यंत तरी शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः ढगाळ आणि बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दररोज पडणाऱ्या पावसामुळे जून महिन्यात अपेक्षित पावसाचा कोटा पूर्ण होत आहे. मात्र, अजूनही ७१ मिलिमीटर पावसाची तूट बाकी आहे. मोसमात आजवर ६७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोकण घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट -

कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या सरीवर सरी कोसळत आहेत. गुरूवारी (ता. २९) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात मोठी घट झाली आहे.

ईशान्य मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही प्रणाली वायव्य आणि पश्चिम दिशेकडे सरकेल. वायव्य राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम विस्तारला आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे कायम आहे. महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

दोन दिवसांत मॉन्सून देश व्यापणार

देशात मॉन्सूनचा वेगाने प्रवास सुरू आहे. त्याने आता देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे. बुधवारी (ता. २८) संपूर्ण अरबी समुद्र राजस्थानच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली. पुढील वाटचालीस पोषक हवामान आहे. त्यामुळे दोन दिवसांत हरियाना, पंजाबसह राजस्थानच्या उर्वरित भागासह संपूर्ण देशभरात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT