Maharashtra Monsoon Updates sakal
महाराष्ट्र बातम्या

दिलासादायक : मान्सून पुढच्या दोन दिवसात महाराष्ट्रात होणार दाखल

१० जूनच्या नंतर मुंबईत मान्सून येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : केरळात २९ मे रोजी मान्सून दाखल झाला असून त्याचा महाराष्ट्राकडील प्रवास सुरू आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती दिली आहे.

(Maharashtra Monsoon Updates)

मान्सून पहिल्यांदा महाराष्ट्रातील कोकणात दाखल होतो. त्यानंतर सात ते आठ दिवसांत मुंबईत दाखल होत असतो. त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होत असते. त्यामुळे १० जूनच्या नंतर मुंबईत मान्सून येणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती दिली दिली होती. मान्सून केरळात दाखल झाल्यावर एका आठवड्यात महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होत असतो. त्यानंतर एका आठवड्यात मुंबईत मान्सून दाखल होत असतो.

दरम्यान स्कायमेटने हवामान विभागाच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एका निरिक्षणावरून अंदाज व्यक्त करणे म्हणजे निकषांचे उल्लंघन आहे असा दावा स्कायमेटने केला होता. म्हणून केरळात मान्सून दाखल झाला नाही असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता हवामान विभागाने दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर येणार असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT