Rain esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट; राज्यातही कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत

मॉन्सूनचा पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत असून हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सूनचा पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होत असून हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर आकाश पूर्णतः ढगाळ तर बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या काळात घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविला आहे.

बुधवारी सकाळपासूनच अंशतः निरभ्र असलेले आकाश दुपारनंतर ढगाळ झाले. काही ठिकाणी या काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडला. दिवसभरात शिवाजीनगर येथे ३.५, पाषाण येथे ५, तर हडपसर आणि वडगाव शेरी येथे ०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

राज्यातही कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत. गुरूवारी (ता. ६) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, चुरू, गुना, सिधी, अंबिकापूर, बालासोरपासून मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत विस्तारला आहे. १५ अंश उत्तर अक्षांशालगत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पूर्व-पश्‍चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सापाटीपासून १.५ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्येही चक्राकार वारे वाहत आहेत.

पावसाचा इशारा

अतिजोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, यवतमाळ.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नगर.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'आरोग्‍य विभागात दिवाळीऐवजी शिमगा'; सेवक, सहाय्‍यकांचे पगार थकले; कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा..

Soybean Guaranteed Price:'सोयाबीन हमीभाव केंद्रासाठी खर्डाभाकरी आंदोलन'; कऱ्हाडला शेकाप, रासप, बळीराजा शेतकरी संघटनेची संयुक्तपणे घोषणाबाजी

Festive Makeup For Bride: लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे? मग लक्ष्मीपूजनासाठी करा असा झटपट मेकअप!

गावगुंड होणार तडीपार! झेडपी, महापालिका निवडणुकीपूर्वी सोलापूर पोलिसांनी तयार केली रेकॉर्डवरील ६७०० गुन्हेगारांची यादी; अनेकांवर ‘एमपीडीए’चीही कारवाई

मोठी बातमी! राज्यातील पगारावरील एक लाख शिक्षक २३ नोव्हेंबरला देणार ‘टीईटी’; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर वरिष्ठ अधिकारी म्हणतात,...

SCROLL FOR NEXT