ANI
महाराष्ट्र बातम्या

राज्यात मुसळधार! पाच जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’

सूरज यादव

पुणे - पुण्यासह राज्यातील पाच जिल्ह्यांना शुक्रवारी हवामान खात्याने पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यांमधील घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सून उत्तरेकडे सरकल्यानंतर राज्यातील बहुतांशी भागात बदल होत आहे. त्यामुळे कमाल तापमान कमी-जास्त होत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदले आहे. सध्या मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर कोकण व विदर्भाच्या काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मराठवाड्यात पावसाची उघडीप असून तापमानात काहीशी वाढ झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान मालेगाव येथे ३७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

कोकणात होत असलेल्या पावसामुळे कमाल तापमान २६ ते ३३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही किंचित कमी झाले आहे. या भागात १९ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान होते. मराठवाड्यातही तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर विदर्भात ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी पडत आहेत. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमधील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यात हलक्या ते मध्य स्वरूपाचा पाऊस ढगांच्या गडगडाटासह पडेल. शनिवारनंतर (ता. १९) पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज.

कोकणात मॉन्सून सक्रिय
कोकणात मॉन्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे या भागातील जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. कोकण-गोव्यात मध्यम काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल. शनिवारनंतर (ता. १९) पावसाचा जोर वाढेल.

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस
शुक्रवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ
शनिवार : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, संपूर्ण विदर्भ
रविवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ
सोमवार : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT