Winter Session 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2024 : अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यातही येणार पेपरफुटीचा कायदा; आश्वासन देत फडणवीस म्हणाले...

Devendra Fadnavis : ''तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथं घोटाळा झाला नाही. पण आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला आहे. पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जातोय, आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत‌ कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे, याच अधिवेशनात हा कायदा आणला ‌जाईल'

संतोष कानडे

मुंबईः राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यामध्ये पेपरफुटीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत, त्यावरुन सभागृहात विरोधकांनी आवाज उठवला. शिवाय परीक्षेसाठी लागणारी मोठी फीस, नॉर्मलायझेशन यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.

पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी राज्याचा पेपर फुटीचा कायदा आणणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात केली. सुरुवातीला मुद्दा मांडताना रोहित पवार म्हणाले की, पेपर फुटीबाबत सरकार कायदा करणार आहे का? केंद्राचा‌ कायदा आला त्यांचं कौतुक आहे, तसा कायदा इथंही आणावा लागेल.

रोहित पवारांना उत्तर देतांना फडणवीस म्हणाले की, तलाठी परीक्षेत उत्तर चुकले होते, तिथं घोटाळा झाला नाही. पण आम्ही १ लाख लोकांना पारदर्शी रोजगार दिला आहे. पेपरफुटीचा नरेटिव्ह सेट केला जातोय, आम्ही एक लाख लोकांना रोजगार दिला हा रेकॉर्ड आहे. पेपरफुटीबाबत‌ कायदा करण्यासाठी आमचा मनोदय आहे, याच अधिवेशनात हा कायदा आणला ‌जाईल, असं फडणवीस म्हणाले.

पदभरतीच्या संदर्भातने बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आपण म्हणता पेपरफुटी पूर्वीच्या सरकारच्या काळात झाली, पण २०२२-२३ मध्ये अनेक भरतींचा पेपर फुटला, मग त्याला जबाबदार कोण? पेपरफुटी ही कीड आहे ती थांबवली पाहिजे.

त्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं, भास्कर जाधव फेक नरेटिव्ह दाखवत आहेत. युवांमध्ये असंतोष कसा होईल यासाठी फेक नरेटिव्ह केलं जात आहे, पुण्यात एक वेबसाईट आहे ती हे पसरवण्याचं काम करते आहे. ती आता एका व्यक्तीनं टेकओव्हर केली आहे, मी गृहमंत्री आहे, सर्व गोष्टी माहिती असतात. शांत स्वभाव आहे म्हणून बोलत नाही असं नाही असं फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख काय म्हणाले?

  • तुम्ही म्हणता भरती झाली पण अजून जवळपास अडीच लाख पदं रिक्त आहेत

  • सरकारमध्ये अजून ३३ टक्के पदे रिक्त आहेत

  • गृहविभागात ५७ हजार पदे रिक्त आहेत

देशमुखांना फडणवीसांचं उत्तर

  • पदभरती तुम्हीच रोखली होती, २००५ नंतर भरतीवर रोख आली होती

  • मी मुख्यमंत्री असताना भरती सुरु केली, आपण अजून पदं भरणार आहोत

  • २ वर्षात आम्ही १ लाख पदे भरली आहेत. तुम्ही नोकरभरती बंद केली पण आम्ही सुरू केली.

  • जेवढे मागे जावू तेवढे तुम्ही उघडे पडाल. आम्ही पदे भरणार, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : जंगलातील गुन्हेगारांना पकडले जाते, पण ठेवायचे कुठे? कोल्हापूर वनसंरक्षणातील गंभीर उणीव उघड

शिव ठाकरेपाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याच्या घराला भीषण आग; थोडक्यात वाचला अभिनेता, व्हिडिओमधून दाखवली परिस्थिती

Latest Marathi News Live Update : अंधेरी पश्चिमेतील सॉरेंटो टॉवरमध्ये आग; नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले

Numerology : उशिरा का होईना पण यशस्वी होतातच 'या' तारखेला जन्मलेले लोक...नशिबात असतो अधिकारी बनण्याचा योग

Hormone Balance Tips: हार्मोन संतुलित ठेवायचे आहेत? सायली शिंदेचे खास योग व जीवनशैली टिप्स; दैनंदिन जीवनात कसे अमलात आणायचे पाहा

SCROLL FOR NEXT