Monsoon Session esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : ''५० खोक्यांचे आरोप करणाऱ्यांनी ५० कोटींसाठी मला पत्र दिलं'' शिंदेंनी सभागृहात दाखवला कागद

संतोष कानडे

मुंबईः विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटावर सडकून टीका केली. महत्त्वाचं म्हणजे सभागृहात एक कागद दाखवून ठाकरे गटाकडून ५० कोटींसाठी पत्र आल्याचं सांगितलं.

''मागच्या सरकारमध्ये टोमण्यांचा दर्जा वाढला होता''

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये शासन आपल्या दारी सुरु आहे, मागच्या सरकारमध्ये शासन आपल्या घरी होतं. मागच्या सरकारमध्ये सगळा दर्जा घसरला होता. शिक्षणाचा, गुंतवणुकीचा दर्जा घसरला, विकासांचा दर्जा घसरला. असं असलं तरी टोमण्यांचा दर्जा वाढला होता. आम्ही तुम्हांला दोष देणारे नाहीत तर ठोस काम करणारे आहोत.

पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, शैक्षणिक विकासकामांबाबत सरकारने खंबीरपणे पावलं उचलली आहेत. गणवेशासोबत शूज देण्याचा निर्णय घेतला असून शिक्षकांची ३० हजार पदं पुढील दोन महिन्यात भरणार आहोत. तसेच साखर उद्योगाकरीता शासन पावलं उचलत आहे. उद्योगांसाठी वीज दर कमी केला असून १२०० कोटी रुपयांची सबसीडी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राचा महागद्दार कोण?

''आमच्यावर गद्दारीचे आणि खोक्यांचे आरोप केले जात आहे. हे आता सहनशीलतेच्या पलीकडे जात आहे. महाराष्ट्राचा महागद्दार कोण आहे, हेसुद्ध बघितलं पाहिजे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, मतदारांशी गद्दारी केली, २५ वर्षांच्या मित्राशी गद्दारी केली, शिवसैनिकांशी गद्दारी केली ते आम्हांला गद्दार म्हणत आहेत. उलट आम्ही तर ज्यांच्यासोबत निवडून आलो त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं आहे. आमच्याकडे खूप गोष्टी आहेत, बोलता येतील.''

पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, ५० खोके-५० खोके तुम्ही करता.. परंतु शिवसेनेच्या खात्यातले ५० कोटी रुपये तात्काळ आमच्या खात्यात वर्ग करा, असं पत्र मला आलं होतं. आम्हांला गद्दार म्हणायचं, खोके म्हणायचं अन् ५० कोटींसाठी पत्र पाठवायचं.आता खरी शिवसेना कुणाकडे आहे, आपल्याकडे. तरीही मी त्यांचे पैसे देऊन टाका म्हटलं. आम्हांला काहीही नको, केवळ बाळासाहेबांचे विचार पाहिजेत आणि त्यांना पैशांचं पडलंय. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरे गटावर आरोप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT