eknath shinde devendra fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon session : ''गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर'', अधिवेशनापूर्वी फडणवीसांचं अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण

संतोष कानडे

मुंबईः उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेनशासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांनी अधिवेशनामध्ये सर्व मुद्द्यांना व्यवस्थित हाताळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

सुरुवातीला बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अधिवेशनामध्ये जास्तीत जास्त चर्चा करुन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकांच्या प्रश्नाला न्याय देण्याचा प्रयत्न करु. एकीकडे लोकशाहीच्या गप्पा मारायच्या आणि लोकशाहीच्या मंदिराने दिलेल्या निर्णयाला मानायचं नाही, असं विरोधी पक्षांचं चाललंय.

फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र FDI मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. २.३८ लाख कोटी गुंतवणूक आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आणि तीन राज्यांचे आकडे एकत्र केले तरी महाराष्ट्राची गुंतवणूक ही जास्त आहे. जे सरकार आले आहे, त्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे.

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी शरद पवारांनी दिलेल्या पत्राचाही उल्लेख केला. ''सरकार कोणाचं हे महत्वाचं नाही. महाराष्ट्र मागे गेला ही वस्तूस्थिती नाही. जास्तीत जास्त चर्चा होईल तो सरकारचा विचार आहे. राज्यात अजून समाधानकारक पाऊस नाही. शेतीच्या प्रश्नांवर आम्ही लक्ष देवून आहोत सर्व प्रश्नांवर आम्ही उत्तरं देऊ''

थातूरमातूर उत्तरं देण्याचं काम सत्तापक्षाकडून होणार नाही- अजित पवार

पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना अजित पवार म्हणाले की, सभागृहात आयुधांचा वापर करुन योग्य पद्धतीने काम करणार आहोत. लोकशाही आम्हाला माहिती आहे. सगळे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून पावसाच म्हणावं तसं प्रमाण नाही. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाने पाऊस पडला तर बळीराजा समाधानी राहिल. उत्तरात थातूरमातूर सांगण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून होणार नसल्याचा विश्वास अजित पवारांनी बोलून दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT