Jayant Patil and Sunil Tatkare 
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Session : बंडही खेळीमेळीत? राष्ट्रवादीच्या दोन प्रदेशाध्यक्षांची भेट;10 मिनिटे झाली चर्चा...

रवींद्र देशमुख

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अर्ध्याहून अधिक आमदार सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शरद पवार यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे अजित पवार यांनी खासदार सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केलं.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रदेशाध्यक्ष अर्थात जयंत पाटील आणि सुनील तटकरे आमने-सामने आले. विशेष म्हणजे दोघेही यावेळी अत्यंत खेळीमेळीत बोलताना दिसून आले. दोघांच्या गमंतीजमती पाहून अनेकांना प्रश्न पडला असावा की राष्ट्रवादीतील बंड देखील खेळीमेळीतच झाले नाही ना?

तटकरे आणि पाटील यांच्यात सुमारे १० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र तटकरे खासदार असून विधानभवनात हजर असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी एक विधान केलं होतं. ते म्हणाले होते की, पक्षातील अनेक आमदार म्हणतात की, आम्ही सरकारमध्ये सामील होतो. जेणेकरून निधी मिळेल आणि विकास कामे होतील. दुसरीकडे अजित पवार यांनी अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे आमदारांमध्ये आनंद आहे. एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी खरच बंड आहे की, बंड दाखवण्याचा प्रय़त्न होतोय, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT