Weather Update  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: आज राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता आजही अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज मुंबई आणि पुण्यालाही यलो अलर्ट देण्यात आला असून अनेक भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यांत देखील आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पुण्यात आज आणि उद्या (मंगळवार, बुधवार) मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून सोमवारी (ता. २५) मॉन्सूनने नैर्ऋत्य राजस्थानमधून माघार घेतल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. यंदाही मॉन्सूनचा परतीचा प्रवास उशिराने सुरू झाला असून, दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या आठ दिवस उशिराने मॉन्सूनने राजस्थानातून काढता पाय घेतला आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.

वायव्य भारतात ८५० हेप्टापास्कल उंचीवर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने केंद्रभागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहणारे क्षेत्र (ॲण्टी सायक्लोन) तयार झाले आहे. नैर्ऋत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, तसेच या भागात आर्द्रतेची टक्केवारी कमी होऊन हवामान कोरडे झाले आहे. या पूरक स्थितीमुळे नैर्ऋत्य राजस्थानमधून मॉन्सूनने माघार घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नौखरा, जोधपूर, बारमेरपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतल्याने हवामान विभागाने म्हटले आहे.

मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यंदाही तब्बल आठ दिवसाने (ता. २५) मॉन्सूनने राजस्थानातून माघारीस सुरुवात केली आहे. दोन महिने आणि २३ दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला.

तूर्त पावसाचा जोर ओसरला

राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सोमवारी (ता. २५) ओसरला आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे राज्यातील काही धरणांत किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. राज्यात सध्या पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) नैर्ऋत्य राजस्थानातून माघार घेतली असून राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. २६) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. परतीचा प्रवास सुरू झाल्याने मॉन्सूनचा आस निवळून गेला आहे. आग्नेय उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT