Maharashtra Monsoon  
महाराष्ट्र बातम्या

Monsoon : राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पाऊस, IMD ची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : नैऋत्य मॉन्सून मुंबईत दाखल झाला असून मॉन्सून मुंबईसह कोकणातील बहुतांश भागात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आणखी काही भागांमध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. IMD ने गुरुवारी सांगितले होते की, मॉन्सून सामान्य गतीने पुढे जात आहे आणि येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार मॉन्सून मुंबईत वेळेवर पोहोचला आहे.

विशेष म्हणजे, देशातील वार्षिक पावसापैकी 70 टक्के पाऊस हा मॉन्सून वाऱ्यांमुळे येतो आणि तो कृषी-आधारित अर्थव्यवस्थेसाठी जीवन रेखा मानला जातो. दरम्यान IMD ने गेल्या महिन्यात अहवाल दिला होता की, यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य असेल आणि गेल्या 50 वर्षांच्या सरासरी 87 सेंटीमीटरच्या तुलनेत 103 टक्के पाऊस पडेल. जून ते सप्टेंबर या सक्रिय मॉन्सून कालावधीत देशात सामान्य पाऊस पडण्याचे हे सलग सातवे वर्ष असेल. आसाममध्ये गेल्या महिन्यात पूर आला होता. मॉन्सूनपूर्व पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे रस्ते, रेल्वे ट्रॅक आणि पुलांसह पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले होते.

दरम्यान आजपासून राज्यात येत्या 5 दिवसांसाठी IMD ने मुसळधार ते अती मुसळधार पावसाचे इशारा दिला आहे. दरम्यान पावसाची तीव्रता ही कोकणात जास्त असण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान मुंबईत मॉन्सूनचे धडाक्यात स्वागत झाले आहे. आज 11 जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत मॉन्सूनचे आगमन झाले असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT