महाराष्ट्र बातम्या

राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार

स्नेहल कदम

पावसामुळे याभागात काही ठिकाणी मुसळधार अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

रत्नागिरी - यंदा महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. याशिवाय सोमवार आणि आज मंगळवारीही पावसाची संततधार सुरु आहे. कर्नाटकात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातही (maharashtra) पावसाचा प्रभाव राहणार आहे. (Today monsoon update) यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याने दिली आहे. (monsoon update maharashtra) यानुसार राज्यातील पालघर, ठाणे, नवीमुंबई, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक येथे येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (konkan rain update)

राज्यातील मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा (maharashtra) आणि कोकण प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून आजही दिवसभर कोकणात पाऊस असणार आहे. यामध्ये विषेशत: उत्तर कोकणात पावसाचा प्रभाव अधिक असणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव दिसणार आहे. पावसामुळे याभागात काही ठिकाणी मुसळधार अनेक ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मराठवाडा परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या परिसरातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र हवामाव खात्याच्या अंदाजानुसार मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात पावसाचा जोर कमी होईल मात्र पावसाची संततधार कायम असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT