weather update maharashtra possibility of rain monsoon in mumbai pune konkan maharashtra  google
महाराष्ट्र बातम्या

Rain Update: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या 36 तासांत मिळणार मॉन्सूनपासून सुटका

परतीच्या पावासाने राज्यातील अनेक भागांत थैमान घातले आहे

सकाळ डिजिटल टीम

पुणे : परतीच्या पावासाने राज्यातील अनेक भागात थैमान घातले आहे, सततच्या पावसामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यादरम्यान राज्यातील नागरिकांची मान्सून पासून सुटका होणार आहे. काल विदर्भाच्या अनेक भागातून मॉन्सून निघून गेला असून पुढील 36 तासांत मॉन्सून देशातून निघून जाणार असल्याची माहिती पुण्याच्या हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

24 तारखेच्या दरम्यान समुद्र किनारी चक्रिवादळ निर्माण होण्याची शक्यताअसून 25 तारखेला चक्रीवादळ आंध्र आणि ओरिसा किनारपट्टीपासून पश्चिम बंगाल, बांग्लादेशकडे जाणार. तर महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान आज आणि उद्या कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात ढगाळ वातावरण रहाणार असून मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दबाचे क्षेत्र आहे, तीन ते चार दिवसात ते तीव्र होणार आणि ते होताना त्याचा प्रवास किनारपट्टीच्या भागाकडे होण्याची शक्यता आहे. सोमवारच्या आसपास ते चक्रिवादळात रुपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ तारखेला ते किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल, बांग्लादेशाकडे जाण्याची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. दरम्यान राज्यात या वादळामुळे कुठलाही इशारा हवामान विभागाने दिला नाही, असे होसाळीकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT