monsoon latest update google
महाराष्ट्र बातम्या

पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे - IMD

सकाळ डिजिटल टीम

विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे - IMD

केरळमध्ये मान्सूनचे आगमण झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तो महाराष्ट्राच एंट्री करणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. मान्सूनच्या चाहुलीमुळे राज्यातील काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरजार हजेरी लावली आहे. दरम्यान, आता पुढील चार ते पाच दिवसांसाठी महाराष्ट्रात तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. (monsoon latest update)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रदेशातील नागरिकांना उष्णता आणि पावसापासून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. याउलट विदर्भात मात्र उष्णतेची लाट येणार आहे. महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने विशेष करुन किनारपट्टीवरील नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, कोकण किनारपट्टीसह, पश्चिम महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती अधिक अनुकूल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ सोडून राज्यातील इतरही काही भाग जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसाचे आगमन वेळेआधी होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून टाकली आहेत. तर काही ठिकाणी अजूनही शेती कामांची धांदल सुरु आहे. त्यामुळे आता शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसासाठी अनुकूल परिस्थिती असली, तरी मुंबईत पावसाच्या आगमनासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, अशी माहितीही हवामानने दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

रिक्षातून प्रवास करणाऱ्या आजीबाईला लुटणाऱ्या चौघी जेरबंद! बुडालेल्या समर्थ बॅंकेच्या लॉकरमधून पैसे घेऊन जात होत्या घरी, वाढदिवसाच्या दिवशीच चोरी

SCROLL FOR NEXT