Rain esakal
महाराष्ट्र बातम्या

पुढील 4 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार; 'IMD'चा अंदाज

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडणार आहे.

श्रीलंका आणि तामिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने सध्या दक्षिण भारतातील राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची चाहूल लागली असतानाच, राज्यात पावसाचे हवामान तयार होत आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 1 नोव्हेंबर म्हणजे आजपासून पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडणार असून ऐन दिवाळीत ढगाळ वातावरण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यत: कोरडे हवामान आहे. मात्र आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील या प्रदेशात पोषक हवामान तयार होत असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मच्छीमारांनी वातावरणाचा अंदाज घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन केले आहे.

२५ ऑक्टोबरला संपूर्ण देशातून यंदाचा मान्सुनने माघार घेतली असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं होत. दरम्यान आजपासून पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत एक कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे. हा कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने पश्चिम दिशेने सरकला असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाच्या शक्यतेची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT