rain konkan sindhudurg
rain konkan sindhudurg 
महाराष्ट्र

पुढील दोन दिवस कोकणासह गोव्यात मुसळधार, हवामान खात्याचा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे.

मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोराडाच गेला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मृगात पावसाचा एकही थेंब पडला नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली. मात्र आता काही ठिकाणी तुरळक पावसाला सुरवात झाली आहे.

यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आता हवामान खात्यानं आणखी एक ट्वीट करत पावसाची माहिती दिली आहे. 24 ते 26 तारखे दरम्यान कोकण, गोवा आणि किनारी कर्नाटकातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 24 आणि 25 रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि 25 जून रोजी दक्षिण गुजरात राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाचा लंपडाव सुरु आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. (maharashtra News) आता पुढील दोन ते तीन दिवस पुन्हा एकदा काही भागात मुसळधार तर काही भागात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (rain update konkan) यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान आज आणि उद्या या दोन दिवसांमध्ये राज्यातील या ठराविक भागांत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. या भागांत अनेक ठिकाणी मुसळधार (heavy rain in konkan) पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT