monsoon water shortage in maharashtra nagar satara sangli 33 8 percent less rainfall  sakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : राज्यातील टंचाईत वाढ; नगर, सातारा, सांगलीमधील स्थिती गंभीर; गेल्यावर्षीपेक्षा ३३.८ टक्के कमी पाऊस

पावसाने बऱ्याच भागात उघडीप दिल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आजअखेर ३३.८ टक्के कमी पर्जन्यमानाची नोंद झाली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पावसाने बऱ्याच भागात उघडीप दिल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आजअखेर ३३.८ टक्के कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नाशिक आणि पुणे या विभागांतील पावसाच्या हजेरीची प्रतीक्षा कायम असून नगर, सातारा, सांगली जिल्ह्यांतील टंचाईमध्ये वाढ झाली आहे.

मागील आठवड्याच्या तुलनेत आता टंचाईग्रस्त २७ गावांची संख्या कमी झाली असून, तहान भागत नसलेल्यांमध्ये ७८ वाड्यांची भर पडली आहे. राज्यात गेल्यावर्षी ऑगस्टच्या मध्याला १२३.४ टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ८९.६ टक्के पाऊस झाला आहे.

दरम्यान, राज्यातील ३२९ गावे आणि १ हजार २७३ वाड्यांना ३५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत, यवतमाळमधील १७ गावांचे १७, जळगाव जिल्ह्यातील १४ गावांचे १३ टँकर बंद करण्यात आले आहेत.

मात्र नगर जिल्ह्यातील २ गावे आणि ४ वाड्या, साताऱ्यातील २ गावे व ६४ वाड्या, सांगलीतील १ गाव आणि ८ वाड्यांना या आठवड्यात टँकरद्वारे अधिकचा पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टच्या मध्याला नगर जिल्ह्यातील ९ गावे व १४ वाड्यांसाठी ७, तर सांगलीतील १० गावे व १४ वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

पुणे विभागात सर्वाधिक टँकर

पुणे विभागातील १२६ गावे आणि ८६१ वाड्यांसाठी राज्यातील सर्वाधिक १३६ टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल नाशिक विभागातील १४१ गावे आणि ३९० वाड्यांसाठी १२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

विदर्भात वरुणराजा परतणार

गेल्या दहा-बारा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारनंतर नागपूरसह संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. येत्या १९ व २० तारखेला गडचिरोली,

चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये तीन-चार दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

दरम्यान, आगामी तीन दिवसांत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये १७ ऑगस्टला नांदेड, १८ ला हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड तर १९ ऑगस्टला हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यांच्या काही भागात वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

जिल्हानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची संख्या (कंसात टँकरची संख्या)

जिल्हा - टंचाईग्रस्त गावे - वाड्या

पुणे -३८ -२७५ (३९)

सातारा ५६ -३४३ (६१)

सांगली --२३- १६९ (२७)

सोलापूर- ९ -७४ (९)

नाशिक -६६ -३८ (५६)

जिल्हा- टंचाईग्रस्त गावे -वाड्या

जळगाव -१३ -० (१५)

नगर -६२ -३५२ (५५)

औरंगाबाद -३०- ४ (४१)

जालना -२७ -१८ (४३)

बुलडाणा- ५- ० (५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT