Monsoon Marathi News google
महाराष्ट्र बातम्या

‘अल निनो’मुळे मान्सून लांबणार? धरणातील पाणी जूनपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार

यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. गारपीट, तापमानातील चढ-उतार, यामुळे मान्सून लांबेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांचा आहे. शासन स्तरावरून जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणातील पाण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्यापासून (ता. ९) उजनी धरणातून डाव्या कालव्यातून (कारंबा, मोहोळ, कुरूल, अंकोली) पाणी सोडले जाणार आहे. उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असणार आहे. त्यानंतर धरणातील जिवंत पाणीसाठा संपणार असून उर्वरित मृतसाठा केवळ पिण्यासाठीच वापरला जाणार आहे. शासन स्तरावरून जलसंपदा विभागाला तशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यांसाठी उजनी धरण वरदान ठरले असून धाराशिव शहरासाठी देखील उजनीतूनच पाणी दिले जाते. अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला, पण सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे सध्या सोलापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होतो. शेतीला पाणी सोडले जाते, पण कॅनॉल नादुरूस्त असल्याने देखील खूप पाणी वाया जाते, अशी सद्य:स्थिती आहे.

धरणात सध्या एकूण पाणीसाठा ७६ टीएमसी असून त्यात जिवंत पाणीसाठा १२ टीएमसीपर्यंतच आहे. दरम्यान, आता शेतीसाठी रविवारपासून आणखी एक आवर्तन सोडले जाणार असल्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणातील जिवंत पाणीसाठा संपणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार फेब्रुवारीपासून कॅनॉल, बोगदा यासह सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून सुरुच आहे. १० मेपर्यंत हे पाणी सुरुच राहणार आहे. त्यानंतर मात्र पावसाळा सुरु होईपर्यंत शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामागे यंदा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता शेतीसाठी शेवटचेच पाणी

यंदाच्या मान्सूनवर ‘अल निनो’चा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. गारपीट, तापमानातील चढ-उतार, यामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याने मान्सून लांबेल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांचा आहे. या पार्श्वभूमीवर शासन स्तरावरून जलसंपदा विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना धरणातील पाण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता शेतीचे आवर्तन संपल्यानंतर उजनी धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवला जाणार आहे.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ७६ टीएमसी

  • जिवंत पाणीसाठा

  • २३ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • १२ टक्के

  • सध्या सोडलेले पाणी

  • ४००० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT