rain update  esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Update: शेतकऱ्यांना दिलासा; मान्सूनने राज्यातून घेतला काढता पाय

आता मॉन्सूनचे पुढील अपडेट एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहेत

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज राज्यातून मान्सून परतला आहे. त्यामुळे आता पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत हवामान विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातून मान्सून पूर्णपणे परतला आहे. त्यामुळे आता दिवाळीत पावसाची शक्यता नाही.

यावर्षी राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातली पिके सडून गेली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी बसला आहे. पावसामुळे कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. महाराष्ट्राच्या उर्वरित भागांसह देशभरातून नैऋत्य मॉन्सून परतला असल्याचे आयएमडीकडून सांगण्यात आले आहे. आता मॉन्सूनचे पुढील अपडेट एप्रिल २०२३ पासून सुरू होणार आहेत.

परतीचा पाऊस आणखी किती दिवस पडणार याची चिंता शेतकऱ्याला होती. मात्र मान्सून राज्यातून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र ओडीशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर सित्रांग चक्रीवादळ निर्माण झाल आहे. त्यामुळे त्याचा फटका ओडीशा आणि बंगाल या दोन राज्यांना बसण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

Kagal-Peth Naka Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पेठ नाक्यावर कोंडी कायम; मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच, 51 टक्के कामानंतर जुना ठेका केला रद्द

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT