ajit pawar kirit somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांच्या कंपन्यांमध्ये १०० कोटी आले, सोमय्यांचा आरोप

'आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाचे ही उत्तर देण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये नाही'

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: "अजित पवारांनी (Ajit pawar) आज महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचा चांगला, प्रोफेशन प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातल्या एकाचे ही उत्तर देण्याची हिम्मत त्यांच्यामध्ये नाही" असे माजी खासदार आणि भाजपा नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) म्हणाले. "जरंडेश्वर साखर कारखाना (jarandeshwar sugar factory) अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला, आता पण तेच चालवत आहेत" असे सोमय्या म्हणाले.

"इन्कमटॅक्सच्या 10 दिवस धाडी चालल्या आहेत. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारांच्या बहिणी, अजित पवारांचे बिझनेस पार्टनर. 1000 कोटींची बेनामी संपत्ती. १०० हून अधिक कोटी रुपये अजित पवार यांच्या कंपन्यांमध्ये आले त्या बद्दल अजित पवार एकही उत्तर देऊ शकले नाहीत असे किरीट सोमय्या म्हणाले.

"साखर कारखाने विकले गेले, त्या बद्दल हरकत नाही. पण बेनामी, भ्रष्ट, घोटाळ्यांची चौकशी होणार" असे सोमय्या म्हणाले. "जरंडेश्वर विकत घेणाऱ्या गुरू कमोडिटी कंपनीला ₹३२ कोटी (अर्धे पैसे) अजित पवारांच्या स्पारकलिंग सोईल आणि ग्रुप कंपनीने दिले" असे सोमय्या म्हणाले.

"गेली १० वर्ष हा कारखाना जरंडेश्वर शुगर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवीत आहे, ज्याचे मालक श्री अजित पवार, त्यांच्या २ भगिनी आणि श्रीमती सुनेत्रा अजित पवार आहेत" असे किरीट सोमय्या म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT