solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

विकृत मानसिकतेचा कहर! साडेसतरा महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील 330हून अधिक अल्पवयीन मुलींवर अत्याचार; विनयभंगाचेही 200 गुन्हे

सोलापूर जिल्ह्यात मागील साडेसात महिन्यात ११७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर ९० अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे समोर आले आहे. मागच्या वर्षी ग्रामीणमध्ये १७९ तर शहरात अंदाजे ५० अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : प्रेमाचे, विवाहाचे आमिष दाखवून अजाणत्या वयात अल्पवयीन मुलींना फसवणूक तिच्यावर अत्याचार करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे. सोलापूर जिल्ह्यात मागील साडेसात महिन्यात ११७ अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर ९० अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे आता समोर आले आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी ही आकडेवारी तातडीने पोलिस महासंचालक कार्यालयास पाठविली आहे. मागच्या वर्षी ग्रामीणमध्ये १७९ अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर शहरात अंदाजे ५० मुलींवर अत्याचार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत.

शाळा-महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या अत्याचार किंवा छेडछाडीची माहिती मुली पालकांना देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागे पालक आपली शाळा बंद करतील आणि लग्न करतील, अशी भीती असल्याचेही दिसून आले आहे. पोलिसांनी दिलेल्या विश्वासातून अल्पवयीन मुली धाडस करून तक्रारी देत आहेत, अशी स्थिती आहे.

सोलापूर शहरात जानेवारी ते २० ऑगस्ट या काळात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे २७ तर विनयभंगाचे ३३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ग्रामीणमध्ये ९० अल्पवयीन मुलींवर बलात्कार तर ५७ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाने सोलापूरसह सर्वच जिल्ह्यांमधील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार व विनयभंगाच्या गुन्ह्यांची माहिती मागविली होती.

पुरूषांचीही विकृत मानसिकता बदलण्यासाठी विशेष अभियान

समाजातील विकृत मानसिकता बदलण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांतर्फे मागील काही महिन्यांपासून ‘रेज रिस्पॉन्सिबल बॉईज’ अभियान राबविले जात आहे. यात शाळा-महाविद्यालयांतील पुरुष शिक्षक व मुले, रिक्षाचालक यांचे प्रबोधन केले जात आहे. पुरुषांमधील मानसिक विकृती नष्ट व्हावी, त्यांच्यात सुधारणा नव्हे परिवर्तन व्हावे, हा त्यामागील उद्देश आहे.

- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

बालविवाहाची माहिती शाळांना का होत नाही?

अठरा वर्षांपूर्वी (२००६ मध्ये) बालविवाह प्रतिबंधक कायदा करूनही अद्याप बालविवाह थांबलेले नाहीत. सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण लक्षणीय असून, जिल्हा बालसंरक्षण समितीने चालू वर्षात सोलापूर जिल्ह्यात ६० पेक्षा अधिक बालविवाह रोखले आहेत. विशेष म्हणजे आठवी-नववी किंवा दहावी-अकरावीत शिकणाऱ्या मुलींचे अल्पवयात विवाह होत असतानाही शाळांना त्याची खबर लागत नाही. आपल्या शाळेतील एखादी मुलगी अचानकपणे शाळेला यायचे बंद करते, त्यामागे नेमके कारण काय, याचा शोध शाळांकडून का घेतला जात नाही, हा संशोधनाचाच विषय आहे.

साडेसात महिन्यातील ‘अल्पवयीन’चे गुन्हे

  • सोलापूर ग्रामीण

  • (२०२३)

  • अत्याचार

  • १७९

  • विनयभंग

  • १०५

(२०२४)

  • अत्याचार

  • ९०

  • विनयभंग

  • ५७

--------------------------------------

सोलापूर शहर

  • (२०२४)

  • अत्याचार

  • २७

  • विनयभंग

  • ३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT